Navratri 2023 : तुम्हीसुद्धा नवरात्रीत उपवास करता? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; अजिबात थकवा जाणवणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Navratri 2023 । आजपासून नवरात्रीचे व्रत सुरू होईल. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे. यानिमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. जर तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर उपवास करत असाल तर या काळात तुम्हाला अशक्तपणा जाणवू नये म्हणून संपूर्ण नऊ दिवस आहाराची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी या उपवासाच्या दिवसात काय खावं की ज्यामुळे आपणास अशक्तपणा येणार नाही याबाबत जाणून घेऊया.

भरपूर फळे खा-

नवरात्री उपवासाच्या संपूर्ण ९ दिवस फळे खाण्यावर जोर द्या. तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकतात. जर तुम्हाला स्वतःला एनर्जेटिक ठेवायचे असेल तर या काळात सफरचंद, केळी, संत्री यासारखी फळे खा. यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, काकडी यांसारख्या पदार्थांचेही सेवन करू शकता.

भरपूर पाणी प्या-

उपवासाच्या काळात शक्य होईल तेवढे जास्त पाणी पिण्यावर भर द्या. महत्वाचे म्हणजे या काळात आपले शरीर नेहमी हायड्रेटड राहिले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे कारण उपाशीपोटी डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते.

दुग्धजन्य पदार्थ-

नवरात्री उपवासाच्या काळात आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश करा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, पनीर, चीज, पांढरे लोणी, तूप, मलाई यासारखे पदार्थ खावेत. यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता भासणार नाही.

ड्राय फ्रूटसचे सेवन करा-

नवरात्री उपवासाच्या काळात आपल्या शरीराला सतत एनर्जेटिक ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स खा. ड्राय फ्रूटसचे सेवन केल्याने अशक्तपणा जाणवत नाही. तुम्ही तुमच्या आहारात मनुका, काजू, पिस्ता आणि बदाम यांसारखे ड्राय फ्रूट्स स्मूदी आणि शेकमध्ये मिक्स करून घेऊ शकता.

लिंबू पाणी प्या-

उपाशीपोटी लिंबू पाणी घेतल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे नवरात्री उपवासाच्या काळात लिंबू पाणी पिल्याने आपली प्रतिकारक शक्ती चांगली होते.