हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण वजन नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. पोटाची समस्या अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे यावर वेळीच उपाय केलेला चांगला… व्यायाम हा मुख्य उपाय तर आहेच पण असेही काही पदार्थ आहेत ज्यांचा समावेश आपल्या आहारात केल्याने पोटाची चरबी कमी करण्यास मदत मिळते. यासाठी आहारात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा समावेश जास्त करावा आणि कार्बोहायड्रेट असणाऱ्या पदार्थांचा समावेश कमी करावा.
प्रोटीन्सचा एक चांगला स्रोत असलेले अंडी ही पोटाची चरबी कमी करण्याचे काम करतात. अंडी सेवन केल्याने आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्याचे सेवन केल्याने तुम्ही अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी भाताऐवजी क्विनोआ खाऊ शकता. यामुळे स्टार्च तुमच्या शरीरात जाणार नाही आणि तुमचा लठ्ठपणा कमी होईल. याच्या सेवनाने तुम्हाला शक्तीही मिळू शकते.
दालचिनीचा चहा वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातली चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दालचिनीमध्ये ऍन्टीऑक्सिडंट आणि ऍन्टीबायोटिक गुण आहेत. ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होऊ शकतं. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक कप दालचिनीचा चहा पिण्याने पोटाचा घेर कमी व्हायला लागेल.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी दहीसुद्धा उपयुक्त ठरते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात, ते आतडी स्वस्थ ठेवण्याचे काम करतात. तसेच ब्लोटिंगची समस्या दूर करतात. दह्यामध्ये प्रोटीन असतात त्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.