शहरात 11 आणि ग्रामीण मध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 42 हजार 924 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 91 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये औरंगाबाद शहरातील गजानन मंदिर, खडकेश्वर, एस टी कॉलनी, शिवाजीनगर याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण तर वेगवेगळ्या भागात 7 रुग्ण आढळले आहे.

ग्रामीण भागातील गंगापूर कन्नड येथे प्रत्येकी एक तर औरंगाबादेतील फुलंब्री मध्ये 2 वैजापूर 5 आणि पैठण येथील 9 रुग्ण आढळले आहे. मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण भागातील 55 अशा 69 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरु असताना हर्सूल येथील 60 वर्षीय पुरुष तलवाडा वैजापूर येथील 85 वर्षीय महिला वाकडा वैजापूर येथील 65 वर्षीय पुरुष सिरसमाळ येथील 28 पुरुष इमांपुर वाडी नागपुर वाडी पैठण येथील 36 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.