औरंगाबाद: शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 141 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3481 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 16 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 3 आणि ग्रामीण मधील 13 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील जाधववाडी 1,संजयनगर 1, एमआयडीसी 1, तर वेदांत नगर 2 रुग्ण आढळून आले आहे.

ग्रामीण भागातील औरंगाबाद 1,गंगापूर 1, कन्नड 3,वैजापूर 15,पैठण 2 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर वैजापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment