हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : प्रत्येकाला वाटतं असते छोटासा का असेना पण आपला स्वतःचा असा एखादा व्यवसाय असावा. मात्र अनेकदा योग्य कल्पना आणि पैशांच्या अभावामुळे ते स्वप्नच राहते. जर आपल्यालाही कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय करायचा असेल तर आजची आपली ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. तर आज आपण ऑइल मिलच्या व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. याद्वारे आपल्याला अगदी सहजपणे 25 ते 30 टक्के नफा मिळू शकेल.
स्वयंपाक करण्यापासून ते औषधे बनवण्यापर्यंतच्या अनेक गरजा भागवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. स्वयंपाक करताना तर तेलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा स्थितीत बाजारात वर्षभर तेलाची मागणी असते. ज्यामुळे जर आपण तेलगिरणीचा व्यवसाय सुरू केला तर तो चांगलाच फायदेशीर ठरू शकेल. Business Idea
हा व्यवसाय कसा सुरू करावा ???
तेल गिरणी सुरू करण्यासाठी, सर्वात आधी आपल्याला एक योग्य जागेचि निवड करावी लागेल. जर आपण गावात ऑइल मिल सुरु केली तर शहराच्या तुलनेत खर्च खूपच कमी होईल. याशिवाय ईथे स्थानिक पातळीवरच कच्चा माल देखील मिळेल. तसेच कमी किमतीत कामगारही मिळतील. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चा माल, यंत्रसामग्री, प्लॅस्टिकच्या बाटल्या, टिनचे डबे इ. गरज भासेल. त्याचप्रमाणे तेल काढण्यासाठी आपल्या सोयीनुसार विजेवर किंवा डिझेलवर चालणारे मशीन घेता येईल. Business Idea
खर्च किती येईल???
छोट्या पातळीवर तेल गिरणी सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामधील सर्वाधिक खर्च हा यंत्रसामग्रीवर होणार आहे. तसेच व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी MSME वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज देखील करता येईल. हा व्यवसाय खाण्यापिण्याशी संबंधित असल्याने यासाठी FSSAI कडून लायसन्स देखील घ्यावे लागेल. Business Idea
अशा प्रकारे करा विस्तार
तेल गिरणी व्यवसायाला चालना देण्यासाठी आपल्याला स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करता येईल. याबरोबरच तेलाच्या पॅकेजिंगमध्ये सुधारणा करून त्याद्वारे ब्रँडिंग देखील करता येईल. याशिवाय ज्या दुकानांमध्ये तेलाचा पुरवठा होईल, तेथे पोस्टर लावून याची जाहिरातही करता येईल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट