हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट बीबीसीने प्रदर्शित केला. याची चांगलीच चर्चा होत असताना आज बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीमधील कार्यालयावर आयकर विभागाने अचानक छापा टाकला.
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रदर्शित केलेल्या माहितीपटा नंतर राज्यात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा दावाही करण्यात आला. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली.
Income Tax department surveys the BBC office in Delhi, as per sources.
The BBC office is in the HT House building located on KG Marg. pic.twitter.com/jJ5mkyM5vV
— ANI (@ANI) February 14, 2023
यावेळी करण्यात आलेल्या छापेमारीत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले असून या छापेमारीमध्ये 50 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत.