हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस : जर आपण रोखीने व्यवहार करत असाल तर त्याबाबत आता सावधगिरी बाळगा. कारण असे केल्याने इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला नोटीस पाठविली जाऊ शकेल. हे लक्षात घ्या की, इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून जास्त रकमेचे रोखीने व्यवहार करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवले जाते आहे. यामुळे जर आपण जास्तीत जास्त रोखीने व्यवहार केल्यास डिपार्टमेंट आपल्याला या पैशांच्या स्रोताबाबत विचारणा केली जाऊ शकते.
सध्याच्या काळात Income tax डिपार्टमेंट कडून आर्थिक अनियमिततेबाबत कठोर पावले उचलली जात आहे. अशा परिस्थितीत रोखीने मोठ्या रकमेचे व्यवहार करणारी सर्व लोकं त्यांच्या रडारवर येतील. आज आपण रोखीने व्यवहार करण्याबाबतच्या नियमांची माहिती जाणून घेउयात…
मालमत्तेसाठी रोख रक्कम भरण्याचे नियम
रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचा वापर केला जातो. तसेच कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी रोख रक्कम भरण्याआधी त्याबाबतचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्या कि, प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे रोखीने मोठा व्यवहार केल्यानंतर त्याचा रिपोर्ट प्राप्तिकर विभागाकडे जातो. जर आपण 30 लाख किंवा त्याहून जास्त किंमतीची मालमत्ता रोखीने खरेदी केली किंवा विकली तर प्राप्तिकर विभागाला लगेचच त्याची माहिती मिळते. हे नेहमी लक्षात ठेवा नाहीतर अडचणीत येऊ शकाल. Income tax
बँकेच्या खात्यामध्ये किंवा एफडीमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करणे
जर आपण एका आर्थिक वर्षात कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्तीची रोख रक्कम जमा केल्यास, प्राप्तिकर विभागाकडून आपल्याकडे त्याबाबतची माहिती मागितली जाऊ शकते. चालू खात्यामध्ये त्याची कमाल मर्यादा 50 लाख रुपये आहे. तसेच, FD मध्ये देखील, एका वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करता येत नाही. यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाइन किंवा चेकद्वारे पैसे भरावे लागतील. Income tax
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट किंवा गुंतवणुकीसाठी
जर आपण क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख र्र्कम वापरल्यास आयकर विभागाकडून आपल्याकडे त्याबाबतची माहिती मागितली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, गुंतवणुकीसाठी देखील जास्त रोख रक्कम वापरता येऊ शकत नाही. जर कोणत्याही शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड्समध्ये रोखीने व्यवहार करण्यासाठी देखील एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम वापरता येणार नाही. असे केल्यानेही प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकेल. Income tax
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळतील 7 लाख रुपये
Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी