शरद पवारांना इनकम टॅक्सची नोटीस; नेमकं काय आहे कारण?

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष काल संपला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना इनकम टॅक्सची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, मला प्रेम पत्र आलंय.. इनकम टॅक्सचे प्रेमपत्र… 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या  लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इनकम टॅक्सने नोटीस पाठवली आहे. पण माझ्याकडे सगळ्याची माहिती व्यवस्थित आहे. त्यामुळे ती माहिती द्यायला मला काही चिंता नाही, असे शरद पवार यांनी सांगितले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही याबाबत ट्विट करत अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार बदलल्यानंतर शरद पवार यांना 2004/2009/2014 आणि 2020 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांसाठी आयकर विभागाची नोटीस मिळाली. हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही. अस म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली.