नवी दिल्ली | नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटने मोठी कारवाई केली आहे. पदावर असताना चित्रा यांनी नोकरभरतीसह इतर कामातही मनमानी केली होती.
17 फेब्रुवारी रोजी इनकम टॅक्स डिपार्टमेंटने चित्रा यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकला आणि अनेक तास झडती घेतली. NSE च्या व्यवस्थापकीय संचालक (MD) असलेल्या चित्रा यांच्यावर सेबीने मोठी कारवाईही केली. बाजार नियामक सेबीने 11 फेब्रुवारी रोजी चित्रा यांना दंड ठोठावला आणि NSE ला सहा महिन्यांसाठी नवीन प्रॉडक्ट्स बाजारात लाँच करण्यास बंदी घातली.
हिमालयवाल्या बाबाला द्यायच्या गुप्त माहिती
सेबीच्या तपासात असे समोर आले आहे की, डिसेंबर 2016 मध्ये आपले पद सोडण्यापूर्वी चित्रा NSE ची अनेक गुप्त माहिती ईमेलद्वारे अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करत असे. हा मेल एका हिमालय बाबाच्या नावावर होता. सेबीच्या म्हणण्यानुसार, त्या ऑर्गेनायझेशनचे स्ट्रक्चर, डिव्हीडंड सिनारियो, फायनान्शिअल रिझल्ट आणि एचआर पॉलिसी विषयी गुप्त माहिती शेअर करत असत. हे चक्र 2014 ते 2014 पर्यंत चालले.
3 कोटी दंड
वरिष्ठ अधिकारी आनंद सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीतील अनियमिततेसाठी सेबीने चित्रा यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा चित्रा म्हणाल्या की,” त्यांनी आनंद यांची नियुक्ती हिमालयात राहणाऱ्या एका बाबाच्या सल्ल्याने केली होती.” आनंद हे 1 एप्रिल 2013 पासून NSE चे मुख्य चीफ स्ट्रेटजिक अॅडवायझर होते आणि नंतर त्यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर बनवण्यात आले.