Thursday, October 6, 2022

Buy now

पुणे- बंगळूर महामार्गावर प्रविण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगलोर महामार्गावर भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर याच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाल्याने ताफा जागेवरच थांबविण्यात आला आहे. स्वतः प्रविण दरेकर यावेळी अपघात झालेल्या गाडीच्या पाठीमागे असणाऱ्या गाडीत होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा दाैऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पुणे- बंगलोर महामार्गावर प्रवास करत होते. या मार्गावरील पारगांव- खंडाळा येथे ताफा आला असता, ताफ्यातील पोलिस गाडीचा (क्रमांक- एमएच-20- ईई- 1951) अपघात झाला. या पोलिस गाडीच्या पाठीमागे प्रविण दरेकर यांची गाडी (क्रमांक एमएच- 47- एएम- 0011) ही होती. अपघातानंतर ताफा जागेवर थांबवून परिस्थितीची स्वतः दरेकर यांनी पाहणी केली.

ताफ्यातील पोलिस गाडीचे पुढील भागाच्या डाव्या बाजूचे नुकसाने झाले आहे. गाडीच्या डावीकडील बाजूच्या टायरवरील भाग तुटलेला आहे. तसेच गाडीला थटलेले सुरक्षित आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा जीवितहानी या अपघातात झालेले नाही.