सातारा | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 909 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 247 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 201 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7.44 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 366 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 24 हजार 34 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 9 हजार 551 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 412 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 19 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची गुरूवारी रात्री आलेली संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात
जावली 6 (9444), कराड 129 (35656), खंडाळा 16 (13260), खटाव 48 (22097), कोरेगांव 37 (19406), माण 46 (15137), महाबळेश्वर 0 (4534) पाटण 14 (9652), फलटण 96 (31567), सातारा 130 (46116), वाई 44 (14577) व इतर 1 (1679) असे आज अखेर एकूण 223125 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.