औरंगाबाद | गेल्या वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण राज्यभरात कोरोना चा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. यातच आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
म्युकरमायकोसिसचे रुग्ण फक्त महाराष्ट्र मराठवाड्यातच नाही तर विदर्भ खानदेशात सुद्धा आढळत आहेत. त्यामुळे खानदेश, विदर्भातील रुग्ण उपचारासाठी औरंगाबादला येत असल्यामुळे बळीचा आकडा वाढल्याचे दिसून येत आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात शुक्रवारी आणि रविवारी म्युकरमायकोसिसमूळे सहा जणांचा बळी गेला आहे. या आजाराने औरंगाबादेत आतापर्यंत 148 तरुणांचा बळी गेला आहे. तर 150 जणांवर उपचार सुरू आहेत. आजाराने रविवारी तीन जणांचा मृत्यू तर यापूर्वी शुक्रवारीही तिघांचा बळी गेला होता.
आतापर्यंत शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये 1159 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 148 जणांचा मृत्यू झाला असून 861 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी घाटीमध्ये दोघांचा, बजाज रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला असून एक नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल झाला आहे. सध्या एमआयटी रुग्णालयात सर्वात जास्त 30, घाटी मध्ये 27,डॉ. हेडगेवार मध्ये 25 आणि जिल्हा रुग्णालयात 11 रुग्ण आहेत.