Thursday, February 2, 2023

शरद पवारांचा जबरा फॅन!! पाठीवर काढला साहेबांचा टॅटू; खुद्द पवारांनीही केले कौतुक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तरुण वर्गातही पवारांची मोठी क्रेझ असून पवार साहेबांच्या अशाच एका कार्यकर्त्याने चक्क पाठीवर शरद पवारांचा टॅटू काढला असून खुद्द पवारांनीही कौतुक केले आहे.

अक्षय साळवे असे या समर्थकाचे नाव असून तो मूळचा बारामती येथील आहे. अक्षयने प्रेमापोटी आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे. शरद पवारांची साताऱ्यातील पावसातील सभा प्रचंड गाजली होती. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.

- Advertisement -

आपल्या पाठीवरील हा टॅटू खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची काल भेट घेतली आणि आपल्या पाठीवर काढलेला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले.