जळगावात कोरोना बाधितांचा वाढता आकडा; आज 244 रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 244 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 8849 झाली आहे. आज दिवसभरात 160 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 5630 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2779 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 440 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 42, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ 14, अमळनेर 08, चोपडा 7, पाचोरा 2, भडगाव 15, धरणगाव 3, यावल 22, एरंडोल 43, जामनेर 21, रावेर 12, पारोळा 16, चाळीसगाव 12, बोदवड 7, मुक्ताईनगर 9 अशी रूग्ण संख्या आहे.

जळगाव जिल्ह्यात काल आढळलेल्या 8605 कोरोना रुग्णांपैकी 427 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मृत्यु झालेल्यापैकी 361 व्यक्ती 50 वर्षावरील वयाचे तर 232 व्यक्तींना इतर आजार होते. त्यामुळे वयोवृध्द व जुने आजार असलेल्यांनी त्रास होत असल्यास तपासणी करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.


Leave a Comment