अश्विन-कुलदीपच्या फिरकीपुढे इंग्लंड ढेर; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रांची येथे सुरू असलेल्या भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी (IND Vs ENG) सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळूनही इंग्लडला आपलं वर्चस्व राखता आलं नाही. इंग्लडचा दुसरा डाव फक्त १४५ धावांवर आटोपला. आर अश्विन (R Ashwin) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या फिरकीपटुंच्यासमोर इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. इंग्लंडने भारताला फक्त 191 धावांचे लक्ष्य दिले असून दिवसअखेर भारताचा स्कोर बिनबाद ४० असा राहिला आहे.

आज भारताचा डाव ३०७ धावांवर आटोपल्यावर इंग्लंडला ४६ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. इंग्लंडचा संपूर्ण डाव 145 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रोवलेने सर्वाधिक ६० धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने ३० धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने ५ बळी घेतले तर कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. तर जडेजाला १ बळी वर समाधान मानावे लागले.

यानंतर 191 धावांचे लक्ष्य समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि दुसरा सलामीवर यशस्वी जैस्वाल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दिवस संपेपर्यंत भारताचे ८ षटकात बिनबाद ४० धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २७ चेंडूत २४ धावांवर नाबाद आहे तर यशस्वी जैस्वाल २१ चेंडूंवर १६ धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी आणखी १५२ धावांची गरज आहे. उद्या सकासकाळी पहिल्याच सेशनमध्ये मॅच संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. हा कसोटी सामना जिंकल्यास ५ कसोटी सामन्याची मालिका भारताच्या खिशात जाईल.