मैदानात पुन्हा घुमणार ‘इंडिया, इंडिया’चा नाद; क्रिकेट चाहत्यांना मिळणार स्टेडियमध्ये एंट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भारतात क्रिकेट सामने झाले नाहीत. आयपीएल २०२० स्पर्धा झाली पण ती युएईमध्ये त्यामुळे चाहत्यांना घरीच बसून सामने पाहावे लागले. भारतीय संघ आता एक वर्षानंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे. अशा वेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून भारतीय चाहत्यांना मैदानात प्रवेश मिळणार आहे.

पुढील महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु होणार असून ही मालिका स्टेडियममध्ये जावून पाहता येईल. ऑस्ट्रेलियात ज्या प्रमाणे मैदानात काही प्रमाणात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. त्याच प्रमाणे भारतात देखील दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्ध चेपॉक आणि मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी मालिकेत मैदानाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार सुरू आहे. पाच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होणार आहेत. त्यानंतरचे दोन अहमदाबाद येथे होतील.

सध्या तरी आम्ही ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देऊ शकतो. याबाबत बीसीसीआय दोन्ही संघ आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे. करोना रुग्णांची संख्या आणि चेन्नई तसेच अहमदाबाद येथील रुग्णांची संख्या अधिक असल्यास हा निर्णय बदलला जाऊ शकतो. आवश्यक ती काळजी घेऊन ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळाली तर आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी चाहत्यांना मैदानावर प्रवेश मिळू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment