नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. पण आता त्याच्यासाठी इंग्लंडचा दौरा करो या मरो असा असणार आहे. कारण त्याची या वर्षातील कसोटी सामन्यांमधील सरासरी २० देखील नाही आहे. त्यामुळे जर त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अजिंक्य रहाणेने या वर्षात १० डावांमध्ये फलंदाजी करत त्याने फक्त २०० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याला १० पैकी ८ डावांमध्ये तर त्याला ३०पेक्षा जास्त धावादेखील करता आल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंडमध्ये अजिंक्यची मोठी कसोटी लागणार आहे. या दौऱ्यात जर त्याने चांगली कामगिरी केली नाहीतर त्याचे कसोटी संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अजिंक्यसाठी इंग्लंडचा दौरा हा खूप महत्वाचा असणार आहे.
अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे कर्णधारपदसुद्धा भूषवले होते आणि त्याने देशाला ऐतिहासिक विजयही मिळवून दिला होता. यामध्ये एका सामन्यातील त्याचे शतक सामना जिंकवून देणारे ठरले होते.त्यामुळे या दौऱ्यानंतर अजिंक्य भारताचा कर्णधार होईल का अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. पण भारतामध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद स्विकारले होते आणि ही मालिका जिंकली होती. पण या संपूर्ण मालिकेत अजिंक्यला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. यामुळे इंग्लंडचा दौरा हा अजिंक्य राहणेसाठी खूप महत्वाचा असणार आहे.