IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले आहे. त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जेम्स अँडरसनने 183 कसोटी सामन्यात 690 विकेट घेतल्या आहेत.
कोणाकोणाला मिळाली संधी – IND vs ENG Test
इंग्लंडने आपल्या संघात ५ फलंदाजांना स्थान दिले आहे. यामध्ये जॅक क्रॉली, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन फॉक्स आणि ओली पोप यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून बेन स्टोक्स आणि रेहान अहमद आहेत तर जॅक लीच, शोएब बशीर, टॉम हार्टलेया फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. इंग्लडच्या या संघात (IND vs ENG Test) मार्क वूडच्या रूपाने एकमेव जलदगती गोलंदाज आहे. जेम्स अँडरसनसारख्या दिग्गज गोलंदाजाला संघात स्थान न दिल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.
असा आहे इंग्लंडचा संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड.
पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार
भारत विरुद्ध इंग्लंड ५ कसोटी सामन्याच्या मालिकेचं वेळापत्रक –
पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम) (IND vs ENG Test)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवी कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)