नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. साहजिकच अशा स्थितीत कर्णधार म्हणून विराटचा विक्रमही चांगला होत आहे. तो या अगोदरच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे आणि आता त्याची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की विराटच्या नावावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाचे सर्व विक्रम असतील. लॉर्ड्स कसोटीच्या विजयामुळे विराट कोहलीने अजून एक विक्रम मोडला आहे.
इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर विराट कोहली एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. या अगोदर धोनी आणि विराट कोहली 8-8 कसोटी विजयांनी बरोबरीत होते, परंतु लॉर्ड्सच्या विजयाने कोहलीला आता आणखी पुढे नेले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामने जिंकले आहेत, जे कोणत्याही एका संघाविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धही यश
याआधी कोहलीने इंग्लंडविरुद्ध 8 सामने जिंकून धोनीशी बरोबरी केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 कसोटी सामने जिंकले होते, जे सर्वात जास्त होते. या यादीमध्ये कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 सामने जिंकले आहेत. तसेच कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला श्रीलंकेविरुद्ध बरेच यश मिळाले आहे. कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 63 कसोटी सामन्यांमध्ये 37 सामने जिंकले आहेत.