मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया (India) क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाने (India) नुकत्याच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्या मॅचमध्ये आयर्लंडवर 16 बॉल आणि 7 विकेट शिल्लक ठेवून विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 12-12 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. या पहिल्या टी-20 मॅचचा हिरो लेग स्पिनर युझवेंद्र चहल होता. भारताचे (India) अन्य बॉलर आयर्लंडच्या बॅट्समनसमोर संघर्ष करत होते, तिकडे चहलने उत्कृष्ट बॉलिंग केली. त्याने 3 ओव्हरमध्ये फक्त 11 रन देऊन 1 विकेट मिळवली. चहलच्या या बॉलिंगमुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आले होते.
आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारी टीम
आयर्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात हरवून टीम इंडियाच्या (India) नावावर नवा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या सामन्यातील विजयानंतर भारतीय टीम (India) टी-20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारी टीम ठरली आहे. या रेकॉर्डमध्ये भारताने (India) ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे.
ऑस्ट्रेलियन टीमने टी-20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना 94 मॅच खेळल्या, यातल्या 54 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर 37 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. भारतीय टीमने (India) आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडविरुद्ध 75 वा सामना खेळला, यातला 55वा सामना जिंकण्यात त्यांना यश आलं, तर 19 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल
साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन
मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू