IND vs IRE: आयर्लंडचे ‘हे’ 5 खेळाडू टीम इंडियावर पडू शकतात भारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये सराव सामना खेळत आहे. त्याचवेळी दुसरा संघ आयर्लंड (IND vs IRE) विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका (IND vs IRE) खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. 26 जूनला टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध सीरीजमधला पहिला टी 20 सामना खेळणार आहे. डब्लिनमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सीरिजसाठी (IND vs IRE) कॅप्टन हार्दिक पंड्या, उमरान मलिक आणि कोच व्हीव्ही एस लक्ष्मण अजून आयर्लंडमध्ये दाखल झालेले नाहीत. दोन सामन्यांच्या या सीरीजसाठी टीम इंडियाने युवा खेळडूंना संधी दिली आहे.

आयर्लंडची टीम भारतासमोर (IND vs IRE) कमकुवत दिसत आहे. मात्र ते घरच्या मैदानावर ते कुठल्याही टीमला दणका देऊ शकतात. भारताने आपला दुय्यम संध पाठवला असला, तरी आयर्लंडने (IND vs IRE) मात्र मजबूत संघ उतरवला आहे. त्यांना मायदेशातील परिस्थितीत खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आयर्लंडचे क्रिकेटपटू काउंटी क्रिकेटही खेळतात. त्यामुळे टीम इंडियाला ते धक्का देऊ शकतात. आयर्लंडचे 5 खेळाडू टीम इंडियावर भारी पडू शकतात. ते कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. चला पाहूया ते नेमके कोणते खेळाडू आहेत.

पॉल स्टर्लिंग
आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग टीम इंडियासाठी धोकादायक आहे. त्याला आयर्लंडचा सेहवाग समजतात. स्टर्लिंग आयरिश संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो जगभरातील टी 20 आणि टी 10 स्पर्धांमध्ये खेळत असतो. त्याच्या टॅलेंटची सर्वानाच कल्पना आहे. स्टर्लिंगने आतापर्यंत 102 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 29.53 च्या सरासरीने 2776 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 20 अर्धशतकं आहेत.

एंड्रयू बलबर्नी
आयर्लंडचा कॅप्टन एंड्रयू बलबर्नी सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण करेल. त्याने 66 टी 20 सामन्यात 1429 धावा केल्या आहेत. त्याने 5 अर्धशतक झळकावली आहेत. बलबर्नी मधल्याफळीत खेळतो. तो कठीण परिस्थितीत धावा करण्यासाठी ओळखला जातो.

हॅरी टॅक्टर
आयर्लंडचा युवा फलंदाज हॅरी टॅक्टरही महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 32 टी 20 सामन्यात 23 पेक्षा जास्त सरासरीने 540 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 130 चा आहे.

जॉर्ज डॉकरेल
जॉर्ज डॉकरेल याने 92 टी 20 सामन्यात 76 विकेट घेतल्यात. 7.13 त्याचा इकॉनमी रेट आहे. या गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके खेळणं कोणत्याही फलंदाजाला सहज शक्य नाही.

मार्क एडेयर
मार्क एडेयर हा वेगवान गोलंदाजही टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो. त्याने 39 सामन्यात 59 विकेट घेतल्यात. 7.07 त्याचा इकॉनमी रेट आहे. एडेयर आयर्लंडचा सर्वात मोठा विकेट टेकर बॉलर आहे.

हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट

अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!

Leave a Comment