पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Blaind Pakistan team
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. याचा परिणाम अनेकवेळा खेळावर दिसून आला आहे. टीम इंडियामधील खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नाहीत, आणि पाकिस्तानचे खेळाडू टीम इंडियामध्ये येत नाहीत. हे दोन्ही देश फक्त मोठ्या टुर्नामेंटमध्ये एकमेकांच्या विरोधात (Ind-Vs-Pak) खेळत असतात. या दोन्ही देशांमध्ये अजूनही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येत नाही आहे. अंध क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धा यंदा भारतामध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी (Ind-Vs-Pak) पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात खेळण्याची संधी गृह मंत्रालयाने दिली आहे.

पीटीआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाने अंध T20 विश्वचषक स्पर्धेसाठी सगळ्या खेळाडूंना खेळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ब्लाइंड टी-20 विश्वचषक स्पर्धेला (Ind-Vs-Pak) 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. 15 डिसेंबरला या स्पर्धेची सेमीफायनल मॅच होणार आहे तर 17 डिसेंबरला बेंगलोरमध्ये फायनल खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे (Ind-Vs-Pak) सामने दिल्ली, फरीदाबाद, मुंबई, इंदौर आणि बेंगलुरु या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. बांग्लादेश, नेपाल, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि साउथ अफ्रीका, भारत या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आता पाकिस्तानदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे.

Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या