IND vs WI 1st ODI : शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

Shubman Gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात शिखर धवन, शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर यांनी उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. यांची फलंदाजी पाहून टीम इंडिया सहज 400 पार करेल वाटत होते. मात्र या तिघांची विकेट घेऊन वेस्ट इंडिजने जोरदार कमबॅक केले. यावेळी इंडियाने 35 षटकांत 2 बाद 225 धावा केल्या होत्या. परंतु पुढील 15 षटकांत 83 धावांत 5 फलंदाज बाद करून वेस्ट इंडिजने जोरदार कमबॅक केले. या सामन्यात धवन, श्रेयस व शुबमन (Shubman Gill) या तिघांनी विक्रमी कामगिरी केली.

या सामन्यात श्रेयसने वन डे क्रिकेटमध्ये जलद 1000 धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. विराट कोहली व शिखर धवन यांनी 24 डावांत हा पराक्रम केला होता. नवज्योत सिंग व श्रेयस यांनी 25 डावांत, तर लोकेश राहुलने 27 डावांत वन डे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता.

वेस्ट इंडिजमध्ये वन डेत अर्धशतक झळकावणारा शुबमन (Shubman Gill)  हा विराट कोहलीनंतर दुसरा युवा फलंदाज ठरला आहे. शुबमनचे वय 22 वर्ष व 317 दिवस आहे. तर विराटाचे वय 22 वर्ष व 215 दिवस एवढे होते. सचिन तेंडुलकरचे वय त्यावेळी 24 वर्ष व 3 दिवस होते. शुभमन गिलने सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडला आहे. या विजयासह भारताने या सिरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर