नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला (IND vs WI ODI) सुरुवात होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज पोर्ट ऑफ स्पेन याठिकाणी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत या खेळाडूंच्या अनुपस्थितीत हा सामना खेळणार आहेत. शिखर धवन या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. मात्र यादरम्यान पहिल्या वनडेआधीच (IND vs WI ODI) टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर?
टी-20 विश्वचषक पाहता बीसीसीआयला धोका पत्करायचा नाही, त्यामुळे जडेजाला संपूर्ण वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत आणखी वाढू नये. संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी (IND vs WI ODI) जडेजाला विश्रांती दिल्यास तो 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकेल.
उपकर्णधार कोण होणार?
जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोरही पेच निर्माण झाला आहे. त्याला वनडे मालिकेसाठी (IND vs WI ODI) उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी नवीन उपकर्णधाराची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे आता टीम व्यवस्थापन उपकर्णधारपदी कोणाची निवड करतात ते पाहणे महत्वाचे आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर