IND vs ZIM: Shubman Gillने मोडला सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा ‘हा’ जुना विक्रम

Shubman Gill
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) आपल्या कारकिर्दीतले पहिले आंतरराष्ट्रीय वनडे शतक झळकावले आहे. हरारे येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) 97 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी खेळली. यामध्ये गिलने (Shubman Gill) 15 चौकार आणि 1 षटकार मारला. या शतकाबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. केएल राहुल 30 धावा करून बाद झाल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीपासूनच चांगली खेळी खेळली. 82 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. शुबमन गिल (Shubman Gill) आणि ईशान किशन जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 127 चेंडूत 140 धावांची भागीदारी केली.

झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या शुभमन गिलने (Shubman Gill) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये बुलावायो येथे नाबाद 127 धावा केल्या होत्या. शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे. याआधी त्याने (Shubman Gill) कसोटीत चार अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतके केली आहेत. हे शतक झळकावल्यानंतर गिल रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. गिलच्या आधी रोहित आणि राहुलनेही झिम्बाब्वेमध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. रोहितने 2010 मध्ये आणि राहुलने 2016 मध्ये ही कामगिरी केली होती.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!