पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोटसुद्धा लिहिली आहे. या मुलीने गावातील तीन मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘आब्या’मुळे आयुष्याचा शेवट करत आहे असे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून सिद्धी गजानन भिटे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळी तिने साडेपाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीने आपल्या आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये, म्हणून हे पाऊल उचलले आहे. हि विद्यार्थिनी इयत्ता नववीत शिक्षण घेत होती.
सुसाईड नोटमध्ये ‘आब्या’चा उल्लेख
या मुलीने आत्महत्या करण्याच्या अगोदर जी चिट्ठी लिहीली होती त्यामध्ये तिने ‘आब्या’मुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
गावातील तीन मुलांकडून छेडछाड
या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती. यानंतर पोलिसांनी सिद्धीचे वडील गजानन भिटे यांच्या तक्रारीवरून तिघा मुलांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सिद्धीने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.