राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड; चित्रा वाघ यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून सध्या अनेक प्रकरणांवरून राज्य सरकावर टीका केली जात आहे. राज्यात होत असलेल्या गर्भपाताच्या घटना आणि आर्वी तालुक्यातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली यावरून चित्रा वाघ यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे; आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत राज्य सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आर्वी तालुक्यात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भधारणा झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घालणारे आई, वडील आणि मुलीचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला आर्वी पोलिसांनी अटक केली. 30 हजार रुपये घेऊन गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे.

“राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे; आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. ३०-३० हजारात सौदेबाजी चाललीय चिमुकल्या जीवांशी खेळण्याची. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

पोलिसांना खोदकामात कवट्या हाडं गर्भपिशव्या आढळल्या.. इतक्या क्रूरपणे चिमुकल्या जीवांची छळवणूक केली. नियम धाब्यावर बसवले, कायदे पायदळी तुडवले, कायदे कमजोर नाहीत. त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहण्याची गरज आहे. पुन्हा एकदा भरारी पथकं स्थापा आणि यात सापडलेल्या एकाही हरामखोराला सोडू नका, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

Leave a Comment