सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे काम सुरू करावे आणि विस्थापित केलेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी खेड ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव यांनी मेडिकल कॉलेजच्या जागेवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांनी गुरूवारी मेडिकल कॉलेजचे बांधकाम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल यादव, कामेश कांबळे यांनी विस्थापित गाळेधारकांचे प्राधान्याने पुर्नवसन झालेच पाहिजे. परंतु, राजकीय स्वार्थापोटी मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, गाळेधारकांचे पनर्वसन करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याकडे लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करावा. त्यासाठी आम्ही गाळेधारक व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत. तसेच महाविद्यालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खेड असे नाव द्यावे, अशी मागणी केली.
राजकीय द्वेष व हव्यासापोटी काम बंद करून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवणे तसेच या भागाच्या विकासात अडथळा निर्माण करणे योग्य नाही, असा आरोप करत आहेत. यावेळी माजी सभापती मिलिंद कदम, सुजित पवार, पिंटू गायकवाड, भारती काळंगे, संतोषभाऊ जाधव यांच्यासह गाळेधारक यांच्यासह नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.