हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडने जगात देशाचं नाव उंचावलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडसोबत आहे, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. बॉलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. अनिल देशमुख यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.
अनिल देशमुख म्हणाले , फक्त काही लोक ड्रग्स प्रकरणात असल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचे नाव खराब करणे चुकीचे आहे. जे लोक ड्रग्स प्रकरणात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव मोठं केल आहे आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे.
फक्त काही लोक ड्रग्स प्रकरणात असल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचे नाव खराब करणे चुकीचे आहे. जे लोक ड्रग्स प्रकरणात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव मोठं केल आहे आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 17, 2020
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा इशारा दीला होता. तसेच सामना अग्रलेखातुनही टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही.अस सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’