भारतीय फिरकीपुढे साहेबांचे लोटांगण ; भारताचा इंग्लंडवर डावाने विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 1 डाव आणि 25 धावांनी पराभव केला. भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या पुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

तत्पूर्वी रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर आणि वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात इंग्लंड वर 160 धावांची आघाडी घेतली होती. वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर नाबाद राहिला तर अक्षर पटेल ने 43 धावांची उपयुक्त खेळी केली होती.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डॅनियल लॉरेन्स ने सर्वाधिक 50 धावा केल्या. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडगोळी पुढे इंग्लिश फलंदाजानी गुडघे टेकले. अश्विन आणि अक्षरने प्रत्येकी 5-5 बळी घेतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’