सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लडाख । गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या जखमा अजून भरल्या नसताना भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा एकदा झडप झाल्याचं वृत्त आहे. पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याची माहिती समोर आली असून, यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. भारतीय लष्कर शांतता राखण्यावर विश्वास ठेवतं, पण आपल्या सीमेचं रक्षण करण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय लष्कराने दिली आहे. भारताकडून या भागात सैनिकांची संख्या वाढवण्यात आलीय. चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावार फ्लॅग मीटिंग सुरू आहे.

यापूर्वी जूनमध्ये (१५ जून) लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यानचा तणाव काही निवळताना दिसत नाही. सैन्य स्तरावर चर्चा सुरू असतानाच परराष्ट्र मंत्रालय आणि दोन्ही देशांच्या ‘वर्किंग मॅकेनिजम फॉर कन्सल्टेशन अँड को-ऑर्डिनेशन’नंही चर्चा केलीय. परंतु, वादावर तोडगा निघालेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.