नवी दिल्ली । भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. भारतात कोरोनाच संकट वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं आता उच्चांक गाठत आहे.दरम्यान, आज भारतात करोना रुग्णांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत देशात ११ हजार ९३३ कोरोनाची लागण झालेल्याची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत ३९२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. यापैकी १ हजार ३४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १० हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. देशभरात १७० जिल्हे हे करोनाचे हॉटस्पॉट आहेत. या जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार आहेत. तर ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरातील करोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. अशात आता आज ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ इतकी झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”