INDIA FIGHTS CORONA : देशात कोरोना रुग्णसंख्येत घट ,कोरोनमुक्तांची संख्या 2,07,071 पहा ताजी आकडेवारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोना रुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्या पेक्षा अधिक आहे. जी अत्यंत दिलासादायक बाब आहे.

आज प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासात एक लाख 32 हजार 364 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याहून दुप्पट म्हणजेच2,07,07 रुग्णांना कोरोनातून बरे करून डिस्चार्ज देण्यात आला आहेगी. तर माल चोवीस तासात 2,713 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दोन कोटी 85 लाख 74 हजार तीनशे पन्नास इतकी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनातून दोन कोटी 65 लाख 97 हजार 655 व्यक्ती बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाख 40 हजार 702, व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या 16 लाख 35 हजार 993 ॲक्टिव केसेस आहेत. ज्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
तर देशात आतापर्यंत 22 कोटी 41 लाख 9 हजार 448 व्यक्तींना करोना लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

You might also like