कराड | शंभर कोटी लसीचे डोस पूर्ण केल्याबद्दल देशातील वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. परंतु हे करताना आपण खालील गोष्टी विसरता कामा नये असे ट्विट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. यामध्ये दोन मुद्दे मांडलेले असून त्यामध्ये देशात फक्त 20.6 टक्के जनतेचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तर संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत भारताचा 144 वा क्रमांक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने 100 कोटी डोसचे उद्दिष्ट गाठल्याने ही बाब आमच्यासाठी अभिमानाची असल्याचे म्हटले आहे. तसेच लसीकरणातील या कामगिरीमुळे भारत नाव जगभरात झाल्याचे म्हणाले. तसेच अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, त्याला 100 कोटी डोसने उत्तर मिळाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु या सर्वांत आजही आपल्या देशात लसीकरणांची काय परिस्थिती आहे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमधून समोर आणलेली आहे.
शंभर कोटी लसीचे डोस पूर्ण केल्याबद्दल देशातील वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन! हे करताना आपण खालील गोष्टी विसरता कामा नये,
१) देशात फक्त २०.६% जनतेचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.
२) संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत भारताचा १४४ वा क्रमांक आहे.— Prithviraj Chavan (@prithvrj) October 21, 2021
भारतात आजही 80 टक्के जनतेचे संपूर्ण लसीकरण होणे बाकी आहे. तसेच भारताचा लसीकरणात 144 वा क्रमांक हा खूपच खालच्या नंबरवर आहे. त्यामुळे यापुढील काळात लसीकरण मोहिम अजूनही वेगाने वाढविणे गरजेचे असल्याचे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी 100 कोटी डोस पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनही केले आहे.