नवी दिल्ली | भारत अमेरिकेकडून २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील विश्वासू सूत्रांकडून मिळत आहे. या हेलिकॉप्टर ची किंमत २ बिलिअन डॉलर आहे.
भारताला गेली अनेक वर्षापासून गरज असलेल्या या हेलिकॉप्टर च वौशिष्ट्य म्हणजे पाणबुडीला उध्वस्त करण्याची क्षमता असलेलं ‘ रोमियो’ हेलिकॉप्टर असेल. भारतानं या हेलिकॉप्टर साठी अमेरिकेला पत्रही लिहिली आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली होती त्यामुळे या खरेदी साठी लवकरच येत्या काही महिन्यात या करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात. पेंस आणि मोदींची बैठकीत अमेरिका आणि भारताच्या संरक्षण संबंधावर चर्चा झाली त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
संबधित २४ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रयत्न असला तरीही अधिकृत दुजोरा कोणताही देण्यात आला नाही.सध्या तरी हेलिकॉप्टर खरेदी कडे भारताचा कल असला तरीही भविष्यात १२३ हेलिकॉप्टर भारतातच बनविण्याचा मानस असेल.