Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, ‘या’ खेळाडूची टीम इंडियात लागली वर्णी

Team India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सुरु असलेल्या टी- 20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे (Ind vs SA ODI) मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी (Ind vs SA ODI) भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे भारतीय वन डे (Ind vs SA ODI) संघाचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या मोसमात आयपीएल गाजवणाऱ्या आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला भारतीय संघात संधी मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ (Ind vs SA ODI)
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋतुराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, सिराज, दीपक चहर

भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे (Ind vs SA ODI) मालिकेचे वेळापत्रक
पहिला वन डे सामना – 6 ऑक्टोबर, रांची

दुसरा वन डे सामना – 9 ऑक्टोबर, लखनौ

तिसरा वन डे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली

हे सगळे सामने (Ind vs SA ODI) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. या सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवर करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!