मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघ आज, मंगळवारपासून वानखडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या किंबहुना खऱ्याअर्थाने तुल्यबळ संघाचा सामना करणार आहे. नियोजित भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील हा पहिला असून तब्बल १३ वर्षांनी वानखडे मैदानावर हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनही संघ सज्ज आहेत. आतापर्यंत मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने रंगले आहेत. त्यात दोन सामने पाहुण्यांच्या नावावर आहेत.
गेल्यावर्षी याच ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वनडे मालिका ०-२ अशा पिछाडीवरून जिंकून दाखवली होती. क्षेत्ररक्षण, डावाच्या मधल्या षटकांमधील गोलंदाजी आणि विराट आणि रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांमध्ये नसलेले सातत्य या कळीच्या मुद्यांवर टीम इंडियाने एव्हाना तोडगा शोधला असेल, अशी अपेक्षा आहे.
मालिकेचे वेळापत्रक
१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)