‘तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता’ म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये वडील आणि लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. “तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता”, म्हणत पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाच्या अंगावर कोयत्याने वार करून हत्या (Murder) केली आहे. बीडच्या साळेगाव परिसरातील माळरानावर हि घटना घडली आहे. आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. शिवाजी केशव हंकारे असे मृत वडिलांचे नाव आहे तर पवन शिवाजी हंकारे असे आरोपी मुलाचे नाव आहे.

आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून, साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले. त्यानंतर आरोपी पवन याने त्याचे वडील मयत शिवाजी हंकारे यांना, “तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता? असा जाब विचारला. या दरम्यान दोघात बाचाबाची झाली आणि आरोपी पवन याने जन्मदात्या बापाच्या हातावर, पायावर, मानेवर आणि तोंडावर कोयत्याने सपासप वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या (Murder) केली.

यानंतर आरोपी मुलाने वडिलांचा मृतदेह, शेतातील सोयाबीनच्या भुसकटात झाकून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी पवन हा स्वतःचं युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने स्वतः वडिलांचा खून (Murder) करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :
नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

‘आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’

परळीत बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्याला चोरटयांनी लुटले

धक्कादायक ! आश्रममध्ये काम करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, काय घडले नेमके?

IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

Leave a Comment