IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोनावर मात करुन मैदानात परतलेल्या रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) पहिल्याच टी 20 सामन्यात इंग्लंडला (IND vs ENG) 50 धावांनी नमवलं. कोरोनामुळे रोहित शर्माला इंग्लंड (IND vs ENG) विरुद्ध एजबॅस्टन कसोटीत खेळता आले नव्हते. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काल त्याने मैदानावर पुनरागमन केले. रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने (IND vs ENG) कमालीच प्रदर्शन करत इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. त्याच बरोबर रोहितने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सलग 13 टी 20 सामने जिंकणारा रोहित शर्मा टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार बनला आहे.

म्हणून रोहित यशस्वी कॅप्टन
या अगोदर हे रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या असगर अफगाण आणि रोमानियाच्या रमेश सतीसनच्या नावावर होता. त्यांनी टी 20 मध्ये सलग 12 सामने जिंकले होते. रोहितच्या (IND vs ENG) नेतृत्वाखाली सर्वच फॉर्मेटमध्ये भारताचा हा 15 वा विजय आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीने संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉर्मेटसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड केली होती.

धोनी, विराट नंतर अशी कामगिरी करणारा रोहित
रोहित शर्मा (IND vs ENG) एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर टी 20 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. टी 20 मध्ये हजार धावा पूर्ण करणारा रोहित जागतिक क्रिकेटमधील दहावा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच 65 सामन्यात 1971 धावांसह सध्या अव्वल स्थानावर आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment