India vs England 2021 | भारत-इंग्लंड मालिकेतील पहिल्या २ टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर; यांना मिळाली संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ४ सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम ( M A Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दरम्यान, पहिल्या दोन टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर झाले आहेत. त्यानुसार टीम इंडियाच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. याशिवाय नियमित कर्णधार विराट कोहली, दुखापतग्रस्त इशांत शर्मा आणि केएल राहुल, तसेच हार्दिक पंड्याचेही कमबॅक झालं आहे.

पहिल्या 2 टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमित टेस्ट सीरिजमध्ये पराभव केलाय. यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. यामुळे भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. यानंतर टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. यानिमित्ताने आपण इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे मालिकानिहाय वेळापत्रक पाहणार आहोत. (india vs england series team india squads)

कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने हे चेन्नईत खेळण्यात येणार आहेत. यानंतर उर्वरित 2 सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मोटेरा हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. गेल्या वर्षी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले होते. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा डे – नाईट असणार आहे. ही सीरिज टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.

टेस्ट मालिकेचे वेळापत्रक
पहिली टेस्ट | एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 5-9 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

दूसरी टेस्ट | एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 13-17 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

तिसरी टेस्ट | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 24 ते 28 फेब्रुवारी | दुपारी 2 वाजून 30 मिनिटं.

चौथी टेस्ट | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 4 ते 8 मार्च | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक
12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

वन डे मालिकेचे वेळापत्रक
23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’