भारत यंदा गव्हाची विक्रमी निर्यात करणार, अनेक देशांशी सुरु असलेली चर्चा अंतिम फेरीत

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारतामध्ये गव्हाचा बफर स्टॉक असल्याच्या बातमीने या किमतींवर अंकुश ठेवला गेला आहे. भारताकडे सध्या 12 मिलियन टन निर्यातक्षम गव्हाचा साठा आहे. या वर्षी भारत जगातील त्या देशांना गहू निर्यात करेल, जे पूर्वी रशिया आणि युक्रेनमधून गहू घेत असत. या देशांमध्ये गव्हाचा जगातील सर्वात मोठा आयातदार इजिप्तचाही समावेश आहे.

जगभरातील खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया-युक्रेन युद्ध, दुष्काळ आणि जगभरात वाढलेली मागणी यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शिकागोमधील बेंचमार्क गव्हाच्या किमतीने गेल्या महिन्यातच $13.635 प्रति बुशेल या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला आहे. भारताच्या गव्हाच्या निर्यातीमुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा वाढेल. या वृत्तामुळे दरवाढ थांबली आहे.

भारत इजिप्तला गहू निर्यात करणार आहे
गव्हाच्या निर्यातीबाबत भारतातील गव्हाचा सर्वात मोठा आयातदार इजिप्त या देशाशी वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय चीन, तुर्की, बोस्निया, सुदान, नायजेरिया आणि इराण हे देशही गहू मिळवण्यासाठी भारताशी बोलणी करत आहेत. गेल्या दहा महिन्यांत भारताच्या गव्हाच्या निर्यातीत चार पट वाढ झाली आहे. बदललेल्या जागतिक परिस्थितीत, बांगलादेशसारख्या शेजारी देशांव्यतिरिक्त, भारताला आता आफ्रिका आणि मध्य पूर्व प्रदेशातही गहू निर्यात करण्याची संधी मिळेल.

भारत जगाला दिलासा देईल
लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरस्थित धान्य आयात-निर्यात फर्म एग्रिकूप इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय अय्यंगार म्हणतात की,” भारताच्या गव्हाच्या निर्यातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा काहीसा सामान्य होईल. सध्या पुरवठा खूपच कमी आहे.” अय्यंगार म्हणतात की,” भारताच्या गव्हाच्या निर्यातीच्या संभाव्यतेने किमतींवर काही प्रमाणात अंकुश ठेवला आहे. भारताने गव्हाची निर्यात केली नसती तर गव्हाच्या किमतीत मोठी झेप घेतली असती.”

अय्यंगार म्हणतात की,” आता परिस्थिती अशी आहे की, प्रत्येक गहू आयात करणारा देश भारताकडून गहू घेण्याचा विचार करत आहे.” यावेळी भारतीय गव्हाबाबत जेवढा उत्साह दिसत आहे, तेवढा यापूर्वी कधीही दिसला नव्हता, असेही अय्यंगार म्हणाले.

चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. ब्लूमबर्ग सर्वेक्षणानुसार, 2022-23 मध्ये भारतातून 12 मिलियन टन गहू निर्यात केला जाणार आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 8.5 मिलियन टन गव्हाची निर्यात केली. पुरवठा घटल्याने आणि गव्हाच्या किमती वाढल्याने अनेक देश पहिल्यांदाच भारतातून गहू आयात करतील. भारतात गेल्या पाच हंगामात गव्हाचे विक्रमी उत्पादन होत आहे. यामुळे भारताकडे गव्हाचा पुरेसा अतिरिक्त साठा आहे जो तो निर्यात करू शकतो. यावेळी गहू काढणीचा हंगामही सुरू झाला आहे. यावेळीही विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.