“मोदी सरकारचा सरसकट भरमसाठ खासगीकरणाचा निर्णय चुकीचा” ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध वितरणमधील कंत्राटी कर्मचारी तसेच संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे कि सरसकट भरमसाठ खाजगीकरण नको. खासगीकरण करणे चुकीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे,” अशी टीका चव्हाण यांनी केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खासगीकरण होऊ नये या मताचे आम्ही सर्वजण आहोत. ज्या विचारातून बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. त्या विचारातून प्रचंडपणे अशा सार्वजनिक क्षेत्रात मोठं मोठे उद्योग उभे राहिले. मात्र, आमचा खासगीकरणाला विरोधच राहणार आहे. आज जो खासगीकरणाच्या बाबतीत निर्णय घेतला जात आहे. त्याला सर्वांचा विरोध आहे.

कॉंग्रेस पक्षाचे स्पष्ट मत आहे. की खाजगीकरण करणे चुकीचे आहे. मग ते एस टी महामंडळ असो, वीज मंडळ असो किंवा जमिनी विकण्याचा निर्णय असो यामध्ये सरसकट खाजगीकरण चुकीचे आहे. सोबतच केंद्र सरकारने सार्वजनिक उपक्रमातील पाच हजार हेक्टर जमिन विकण्याचा निर्णय घेतला असून सरकरा दिवाळखोरीत चालले आहे. घरचे दागिने विकून जसे घर चालवले जाते तशा प्रकारे मोदी सरकार चालत असल्याची टिका चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या तीनशे आमदारांना घरे देण्याचा निर्णय योग्य नाही – चव्हाण

राज्यात 300 आमदाराना घरे देण्याच्या निर्णयावर बराच गदारोळ सुरु आहे. आमदारांना घरे देण्याच्या घोषणेनंतर आमदार खासदार यांच्या पेंशनवरही चर्चा होवू लागली आहे. याबाबतही पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, अगोदरच राज्य आणि देश एका आर्थिक संकटातून जात आहे. अशात टाळता येण्यासारखा खर्च करणे योग्य नाही.

Leave a Comment