हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. देशभरात या व्हायरसने ३ जणांचा मृत्यू झाला असून बळी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, भारतीय सैन्यातील एक जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.
वृत्तसंस्था एएनआयने सैन्य स्रोतांच्या आधारे दिलेल्या वृत्तात सांगितले की, भारतीय सैन्यातील एका ३४ वर्षीय जवानाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त लष्करी जवानाचे वडील २७ फेब्रुवारी रोजी इराणहून भारतात परत आले होते. सध्या हा जवान लडाखमध्ये कर्तव्यावर आहे.
जवानाच्या वडिलांना २९ फेब्रुवारीला अलग ठेवण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता ६ मार्च रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. दरम्यान सदर लष्करी जवान २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रजेवर होता. रजा संपल्यानंतर २ मार्च रोजी हा जवान पुन्हा कर्तव्यावर सामील झाला.
सुत्रांचा माहितीनुसार, विलगीकरणादरम्यान जवानने त्याच्या कुटूंबाची मदत केली. जेव्हा जवानच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले तेव्हा या जवानालाही ७ मार्चपर्यंत अलग ठेवण्यात आले होते. तर १६ मार्च रोजी जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यानंतर एसएनएम हॉस्पिटलमध्ये जवान अलग करण्यात आला. या युवकाची पत्नी आणि बहिणीलाही विलगीकरणासाठी पाठविण्यात आले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.