भारतीय खेळाडूंची नावलौकिक कामगिरी!! आशियाई स्पर्धेत केली 100 पदकांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) नावलौकिक कामगिरी केली आहे. या सर्व खेळाडूंनी एकूण 100 पदकांवर भारताचे नाव कोरले आहे. तर 25 सुवर्णपदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट देखील शेअर केली आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई खेळामध्ये 100 पदकांची कमाई केल्यामुळे आज त्यांचे संपूर्ण देशभरात कौतुक केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय खेळाडूंचे कौतुक करत म्हटले आहे की, “आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी असामान्य असे यश मिळवले आहे. 100 पदकांच्या विजयामुळे सर्व भारतीय नागरिक रोमांचित झाले आहेत. भारताने इतिहास रचन्यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. खेळाडूंच्या असामान्य खेळीने भारतीयांचे हृदय अभिमानाने भरले आहे.” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.

आजच्या आशियाई स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी टीमने सुवर्णपदक जिंकले आहे. यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या 100 वर पोहोचली आहे. यामध्ये 25 सुवर्ण 35 रोप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. ही सर्व पदके भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत जिंकलेली आहेत. त्यांनी केलेल्या या नावलौकिक कामगिरीमुळे या सर्व खेळाडूंवर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.