BREAKING : भाजपच्या माजी आमदाराच्या गाडीला बसने उडवले, अपघातांनंतर इनोव्हाचा चक्काचूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. विजयराज शिंदे यांच्या इनोव्हा कारला बसने धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुख्य म्हणजे, या अपघातात शिंदे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रकृती विषयी कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकाेला ते अमरावती रस्त्यावर कुरणखेड गावाजवळ घडली आहे. या घटनेमध्ये विजयराव शिंदे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शिंदे यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. आज शिंदे अमरावती येथे भाजप नेते अनिल बाेंडे यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र प्रवासादरम्यानच अकाेला ते कारंजा बसने शिंदे यांच्या इनोव्हा कारला धडक दिली. ज्यामध्ये शिंदे जखमी झाले आहेत.

दरम्यान, राज्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या अपघातांना थांबवण्यासाठी सरकार कोणते ठोस पाऊल उचलेल हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्य म्हणजे, यापूर्वीही राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांसोबत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत नाहीये.