Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्याला कोणतीही जोखीम न घेता गॅरेंटेड रिटर्न हवा असेल तर FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. याच दरम्यान आता Indian Bank कडून ग्राहकांसाठी FD ची खास स्कीम सुरु करण्यात आली आहे. जिचे नाव IND Utsav 610 असे आहे. या योजनेमध्ये बँकेकडून चांगला रिटर्न दिला जातो आहे. या खास एफडी योजनेसाठीचा मॅच्युरिटी कालावधी 610 दिवसांचा असेल.

Indian Bank reports second quarter net profit at Rs 1,089.17 crore | Business Standard News

अति ज्येष्ठ नागरिकांना 6.5% वार्षिक व्याज

या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना 6.10 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 6.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. हे लक्षात घ्या कि, सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजे 80 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाची लोकं. या योजनेची एक्सपायरी डेट 31 ऑक्टोबर 2022 आहे. म्हणजेच ही योजना 31 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. Indian Bank

Sudhir Gupta (@sudhirkg1969) / Twitter

बँकेकडून वेबसाइटवर देण्यात आली माहिती

Indian Bank कडून आपल्या वेबसाइटवर IND UTSAV 610 या योजनेची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये या एफडी स्कीमसाठी बुकिंग कसे करावे हे देखील सांगण्यात आले आहे. या योजनेसाठी INDOASIS मोबाइल एपद्वारे घरबसल्या गुंतवणूक करता येईल. त्याच बरोबर या FD योजनेसाठीचे खाते कोणत्याही कागदपत्रांशिवाय घरबसल्या ऑनलाइन उघडता येईल.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

24 ऑगस्ट 2022 रोजी व्याजदरात झाला बदल

हे लक्षात घ्या कि, Indian Bank कडून 24 ऑगस्ट 2022 रोजी व्याजदरात बदल करण्यात आला होता. आता बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला होता. आता इंडियन बँक 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी FD सुरु केली आहे, ज्यांचे दर 2.80 टक्के ते 5.65 टक्के आहेत. Indian Bank सध्या ज्येष्ठ नागरिक नसलेल्या एफडी खात्यावर जास्तीत जास्त 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर 6.25 टक्के व्याज दिला जातो आहे. हे 3 वर्षात किंवा 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD चे व्याजदर आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/departments/deposit-rates/

हे पण वाचा :

Multibagger Stock : पतंजली फूड्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात दिला 39,000% रिटर्न !!!

Investment : ‘या’ सरकारी बचत योजना देत आहेत FD पेक्षा जास्त व्याज, त्याविषयी जाणून घ्या

Gold Price Today : सोने घसरले तर चांदीमध्ये झाली वाढ, आजचे नवीन दर पहा

आता रोजंदारीवरील मजुरांनाही मिळणार 3,000 रुपयांची पेन्शन !!! EPFO च्या या योजने बाबत जाणून घ्या

Investment : ‘या’ 5 लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुक करून टॅक्स सूटसोबतच मिळवा चांगले रिटर्न