हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank : फिक्स्ड डिपॉझिट्स हा लोकांच्या लोकप्रिय गुंतवणुकीच्या प्रकारांपैकी एक आहे. यामध्ये गुंतवणूक करून आपले पैसे तर सुरक्षितराहतीलच. मात्र याबरोबरच मजबूत रिटर्न देखील मिळेल. जर आपल्यालाही FD करायची असेल तर हे जाणून घ्या कि, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील Indian Bank ने गुंतवणूकदारांसाठी एक खास एफडी स्कीम लाँच केली आहे. या योजनेचे नाव ‘IND SUPER 400 DAYS’ असे आहे. या खास एफडी योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 400 दिवसांचा असेल.
Indian Bank च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, विशेष रिटेल टर्म डिपॉझिट्स प्रॉडक्ट ‘IND Super 400 Days’ 6 मार्चपासून लाँच करण्यात आली आहे. या खास एफडी योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी 400 दिवसांचा असेल. यामध्ये 10,000 रुपये ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवता येते. ही योजना महिला गुंतवणूकदारां बरोबरच इतरांसाठीही खुली आहे. या योजनेअंतर्गत, बँकेकडून महिला गुंतवणूकदारांना 0.05 टक्के जास्त व्याजदर मिळेल. ही योजना 30 एप्रिल 2023 पर्यंतच व्हॅलिड असेल.
अलीकडेच इंडियन बँकेने एफडीवरील दरात केली वाढ
अलीकडेच Indian Bank कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीनंतर बँकेकडून आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याज दर मिळत आहे. 4 मार्च 2023 पासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू होतील.
अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले
विशेष म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली होती. रेपो दरात वाढ झाल्यानंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या एफडी दरात वाढ केली आहे. SBI, ICICI Bank, HDFC Bank, Yes Bank यासारख्या अनेक बँकांनी अलीकडच्या काळात एफडीवर व्याज वाढवले आहे.
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/departments/deposit-rates/
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Multibagger Stock : ‘या’ 5 शेअर्सनी गेल्या 1 वर्षात जोरदार रिटर्न देत गुंतवणूकदारांना केले मालामाल
TATA Group च्या ‘या’ कंपनीने गेल्या 20 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
घरबसल्या अशा प्रकारे तपासा आपल्या LIC पॉलिसीचे स्टेट्स