Saturday, March 25, 2023

संघात धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही – के एल राहुल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्टला अचानक निवृत्ती स्वीकारली. धोनीने निवृत्ती पत्करल्यानंतर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा वारसदार कोण?? ही चर्चा जोर धरू लागली आहे. ऋषभ पंत युवा खेळाडू असून त्याची जागा घेण्यासाठी उत्सुक असला तरी फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही आघाड्यांनवर यशस्वी ठरणाऱ्या केएल राहुलच पहिली पसंती आहे. राहुलने संघात धोनीची जागा घेण्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

“धोनीच्या जागी येणाऱ्या खेळाडूकडून अपेक्षा असणार यात शंकाच नाही. केवळ त्या एकाच नव्हे तर मैदानावरील ११ आणि संघातील १५ खेळाडूंकडूनही सर्वोत्तम कामगिरी अपेक्षा असणार हे नक्की. संघात धोनीची जागा घेणं हा माझा विचार नाही. पण एक मात्र नक्की की संघातील धोनीची जागा ही कोणीही खेळाडू घेऊच शकणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे”, असं राहुल म्हणाला.

- Advertisement -

“आम्ही सारे स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी संघात निवडले जातो आणि देशासाठी शक्य तितके जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो. मला संघात जी कोणतीही भूमिका पार पाडण्यास सांगितलं जाईल ते मला मान्य असेल. एखादी भूमिका पार पाडण्याचे माझ्यात सामर्थ्य असेल म्हणून मला ते काम देण्यात येईल आणि त्याचा मला अभिमान असेल. आणि मी मला शक्य तितकी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन”, असेही राहुल म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’