Thursday, March 23, 2023

सगळं बंद करण्याची सरकारला काही हौस नाही ; संजय राऊत यांनी सुनावले विरोधकांना खडेबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. तसेच अनेक मंदिरं आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“मुंबईत काल अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी विरोध करायचा म्हणून कोणत्याही गोष्टीला विरोध करु नये, रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -

सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवलं पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’