हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या 3 बाद 99 धावसंख्येवरून आपला डाव चालू केला. परंतु सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याचा मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
भारताची झालेली पडझड रोखण्यासाठी ऋषभ पंत आणि आर. अश्विन खेळपट्टीवर आले होते. पण, कर्णधार जो रुटने पंतला बाद करुन भारताला चांगलाच धक्का दिला.फिरकीपटू जॅक लीच आणि इंग्लिश कर्णधार जो रूट यंच्या फिरकी पुढे भारतीय फलंदाजीचा मध्यक्रम अक्षरशः कोलमडला. जॅक लीच ने 4 तर जो रूटने 3 बळी घेतले.
भारताचे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 10 धावात 5 विकेट गमावल्या. जॅक लिच पाठोपाठ रुटने भारताला धक्के देणे सुरुच ठेवले त्याने भारताची बॅटिंग वाढावी म्हणून खेळवण्यात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरचा शून्यावर त्रिफळा उडवला आणि त्यापाठोपाठ अक्षर पटेल देखील बाद झाला. यावेळी भारताकडे फक्त १३ धावांची आघाडी होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’